६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे) हिच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. निद्रादेवीला ‘झोपेत प्रार्थना चालू राहू दे’, अशी प्रार्थना करून झोपल्यामुळे रात्रभर ‘निर्गुण’ हा नामजप चालू रहाणे आणि सकाळी उठल्यावर इतर दिवसांपेक्षा अधिक प्रसन्न अन् उत्साही वाटणे
‘२१.७.२०२० या रात्री झोपण्यापूर्वी माझ्या मनात ‘निद्रादेवीला प्रार्थना करावी’, असा विचार आला. त्याप्रमाणे मी निद्रादेवीला प्रार्थना केली, ‘हे निद्रादेवी, मला शांत झोप लागू दे. झोपेतही मला तुझे स्मरण राहू दे. माझा नामजप अखंडपणे चालू राहू दे.’ प्रार्थना करून झोपल्यामुळे रात्रभर माझा आतून ‘निर्गुण, निर्गुण’ असा नामजप होत होता. नामजपानंतर ‘माझे ध्यान लागले आहे’, असे मला वाटले. सकाळी उठल्यावर मला इतर दिवसांपेक्षा अधिक प्रसन्न आणि उत्साही वाटत होते.’
– कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२०)
२. नामजप करतांना कु. श्रियाचे ध्यान लागणे आणि नंतर दीड घंटा ती ध्यानावस्थेत बसलेली असणे
‘१७.७.२०२० या रात्री ९.३० ते १० या कालावधीत कु. श्रिया आमच्या समवेत नामजपाला बसली होती. नामजपाला आरंभ केल्यावर १० मिनिटांतच ‘तिचे ध्यान लागले आहे’, असे आमच्या लक्षात आले. रात्री १० वाजता नामजपाची वेळ संपल्यानंतरही श्रियाची एकाग्रता आणि हातांची मुद्रा तशीच होती. रात्री ११.३० पर्यंत श्रिया ध्यानावस्थेत बसली होती. रात्री ११.३० वाजल्यापासून १२.१५ वाजेपर्यंत ती एकदम उत्साही दिसत होती. तिला मुळीच झोप येत नव्हती. नंतर बर्याच वेळाने ती झोपली.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आई) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |