क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांची पोलीस महानिरीक्षकांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका
आय.पी.एल्. मधील सट्टेबाजीच्या प्रकरणी वक्तव्य केल्याचे प्रकरण
चेन्नई – वर्ष २०१३ मध्ये झालेले ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजीच्या प्रकरणी वक्तव्य केल्याविषयी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जी. संपत कुमार यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. धोनी यांनी त्यांच्या याचिकेत संपत कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि काही ज्येष्ठ सरकारी अधिवक्ता यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप केला आहे. संपत कुमार यांच्यावर मानहानीचा खटला चालवावा, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सुनावणी होणार आहे.
यापूर्वी धोनी यांनी वर्ष २०१४ मध्ये पोलीस महानिरीक्षक संपत कुमार यांना सट्टेबाजीच्या प्रकरणी धोनी यांच्याशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. या प्रकरणी १०० कोटी रुपये हानीभरपाई देण्याचे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने १८ मार्च २०१४ या दिवशी संपत कुमार यांना धोनीच्या विरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याची तंबी दिली होती. असे असतांनाही संपत कुमार यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करणार्या अधिवक्त्यांच्या विरोधात अवमानकारक टिप्पणी केली होती.
IPS अधिकारी के खिलाफ हाईकोर्ट पहुँचे महेंद्र सिंह धोनी, कोर्ट की अवमानना का आरोप: पहले माँग चुके हैं ₹100 करोड़ का हर्जाना#Dhoni #MadrasHighcourthttps://t.co/taAutvCdyJ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 5, 2022