पाद्रींचे आडनाव ‘भिडे’ किंवा ‘कुलकर्णी’ नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

शरद पोंक्षे यांच्याकडून एका चर्च बाहेरील पाद्य्रांनी वेशभूषेविषयी दिलेल्या सूचनांचे छायाचित्र प्रसारित करून उपाहासात्मक भाष्य

पुणे – एका चर्चच्या बाहेर लावलेल्या एका फलकावर स्त्रियांनी कोणते कपडे घालावे ? याची सूचना दिली आहे. यामध्ये ‘स्लीवलेस, शॉर्ट्स, क्रॉप टॉप किंवा मिनी’ (अर्धवट अंग झाकणारे कपडे) घालून गेल्यास, कपडे पालटून या मगच आतमध्ये सोडू’, असे पाद्य्रांनी नमूद केले आहे. या पाद्रींचे आडनाव ‘भिडे’ किंवा ‘कुलकर्णी’ नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही, असे उपहासात्मक भाष्य मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका ‘फेसबूक पोस्ट’द्वारे केले.


‘सद्य:स्थितीशी याचा काहीही संबंध नाही. केवळ जे वाटलं, दिसलं ते ‘पोस्ट’ केले’, असेही त्यांनी यात म्हटले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका महिला पत्रकाराने कुंकू लावले नसल्याने तिच्याशी बोलण्यास नकार दिला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक माध्यमांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची एकच चर्चा चालू आहे. त्यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी ‘पोस्ट’ शरद पोंक्षे यांनी पोस्ट प्रसारित केली आहे.