ग्राहकांना १० लाख रुपये हानीभरपाई देण्याची दोघा दुकान मालकांना शिक्षा
मद्य विक्री करतांना ग्राहकांकडून ३० रुपये अधिक घेतले !
डेहराडून (उत्तराखंड) – न्यायालयाने हरिद्वारमधील मद्यविक्री करणार्या २ दुकानांना मद्यविक्री करतांना अधिक शुल्क आकारल्याच्या प्रकरणी १० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. यासह खटल्याच्या व्ययासाठी (खर्चासाठी) १० सहस्र रुपयांचा दंडदेखील केला. विजय कुमार आणि मोनू कुमार यांना दुकान मालकांकडून प्रत्येकी ५ लाख रुपये मिळणार आहेत. संबंधित दुकानदारांनी या दोघांकडून व्हिस्की आणि बिअर यांच्या ४ कॅनसाठी अनुक्रमे १० रुपये आणि २० रुपये अधिक आकारले होते. मोनू आणि विजय यांनी हे पैसे ऑनलाईन भरले होते. त्यांच्याकडून कमाल किरकोळ रकमेपेक्षा (‘एम्.आर्.पी.’पेक्षा) अधिक रक्कम घेतल्याचा पुरावा त्यांच्याकडे होता. याविषयी त्यांनी हरिद्वारच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. न्यायालयाने दुकानांना पैसे परत करण्यासाठी ४ संधी दिल्या; मात्र त्यांनी पैसे परत केले नाहीत.
Two booze shops to pay duo Rs 10 lakh for overcharging Rs 30
The shops were given four chances to return the money but they failed. The consumer court found “deficiency in service” and said penalty was fair.https://t.co/5fWzMQPeAA
— The Times Of India (@timesofindia) November 5, 2022