पाकच्या सिंधमध्ये पाडले हिंदूंचे मंदिर !
नवी देहली – पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास भील यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून प्रसारित केला आहे. त्यांनी म्हटले की, हिंदूंना एक दिवसही शांततेत राहू दिले जात नाही. बलपूर्वक धर्मांतरासाठी लक्ष्य करून मारले जाते. अपहरण आणि इतर अनेक समस्याही आहेत.
Another normal day in Pakistan. Another temple being demolished in Ramapir, Sindh, Pakistan. The helpless poor Hindus children’s r registering their protest by raising the temple Flags. When will Bharat as a Nation will stand behind the worldwide prosecuted Hindus? When? pic.twitter.com/vjr4xmbeha
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) November 4, 2022
संपादकीय भूमिकाभारतातील बहुसंख्य हिंदूंचे जेथे रक्षण होऊ शकत नाही तेथे पाक, बांगलादेश आदी इस्लामी देशांमधील अल्पसंख्यांक हिंदू, तसेच त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण कोण करणार ? हे हिंदूंना लज्जास्पद ! |