उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्या धर्मांधाला अटक
वासनांध धर्मांध !
कर्णप्रयाग (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्या आदिल नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी एका अल्पवयीन मुलीने तिच्या कुटुंबियांच्या साहाय्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. ‘पीडित मुलगी शिकवणीच्या वर्गाला जात असतांना आदिल नावाच्या धर्मांधाने तिचा विनयभंग केला’, असे या तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी आदिलच्या विरोधात भारतीय दंड संहिता आणि ‘पॉक्सो’ कायद्याच्या ५०९ कलमाच्या अंतर्गत कारवाई केली आहे.
2194.#HateCrime #CrimesAgainstMinors
Karnprayag Tirth: Aadil molested and teased minor girl students going for studies. Aadil molested them almost daily. Police arrested Aadil under POCSO ,only after the civilians protested in the police station https://t.co/Mjt5lNWv7P— Crime Watch (@tracker_hate) November 5, 2022
उत्तराखंडमध्ये वाढतो आहे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद ! – संत स्वामी दर्शन भारती
उत्तराखंडचे प्रसिद्ध संत स्वामी दर्शन भारती यांनी एका मुलाखतीमध्ये देवभूमीमध्ये वाढत्या धार्मिक आतंकवादाविषयी विधान केले होते. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘संपूर्ण उत्तराखंडमध्ये केवळ ‘लव्ह जिहाद’च नाही, तर ‘लँड जिहाद’ आणि इतर आतंकवादी कारवायाही फोफावत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भीतीने उत्तरप्रदेशातील सर्व समाजकंटक उत्तराखंडमध्ये आश्रय घेत आहेत.’’