सिंधुदुर्ग : कुडाळ येथे पोलीस ठाण्यासमोर उद्योजकावर प्राणघातक आक्रमण करणार्या २ मुसलमान भावांना अटक
कुडाळ – येथील औद्योगिक वसाहतीतील (एम्.आय.डी.सी.तील) उद्योजक चंदू पटेल यांच्यावर ३ नोव्हेंबरच्या रात्री येथील पोलीस ठाण्याच्या समोरच प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हादी अब्दुलबारी खान आणि कयुम अब्दुलबारी खान (सध्या रहाणार आंबेडकरनगर, कुडाळ आणि मूळ रहाणार बरायल, बलरामपूर, उत्तरप्रदेश) या दोघा सख्या भावांना अटक केली. दोघांनाही ४ नोव्हेंबर या दिवशी येथील न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. पटेल यांनी या दोघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग येऊन हे आक्रमण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुडाळ येथील उद्योजक चंदू पटेल याच्यावर प्राणघातक हल्ला; कारण अस्पष्ट, हल्लेखोर ताब्यात #CrimeNewshttps://t.co/nGzN4g3cMF
— Lokmat (@lokmat) November 3, 2022
चंदू पटेल यांनी या दोन खानांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ३ नोव्हेंबर या दिवशी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. तेथे चौकशी आणि जबाब झाल्यानंतर दोघेही खान निघून गेले. थोड्या वेळाने पटेल हेसुद्धा पोलीस ठाण्यातून घरी जाण्यासाठी निघाले असता तेथेच दबा धरून बसलेल्या दोन्ही खानांनी पटेल यांच्यावर दगडाने आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले. पटेल यांचा ओरडण्याचा आवाज येताच नागरिक आणि पोलीस यांनी धाव घेत पटेल यांना आक्रमणापासून वाचवले. या वेळी पोलीस, नागरिक आणि दोघे खान यांच्यात झटापट झाली. या वेळी नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले होते. ४ नोव्हेंबर या दिवशी या दोघांनाही न्यायालयात उपस्थित करण्यात आले.
या घटनेने कुडाळ शहरात खळबळ उडाली असून, शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांसह नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले होते. या वेळी त्यांनी आक्रमणकर्त्यांच्या हद्दपारीची मागणी केली.
संपादकीय भूमिकाउद्योजकाने कामावरून काढले म्हणून पोलीस ठाण्यासमोरच त्याच्यावर आक्रमण करणारे गुन्हेगारी वृत्तीचे मुसलमान तरुण ! |