क्रूरकर्मा टीपू सुलतान याची जयंती साजरी करणे तात्काळ बंद झाले पाहिजे ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
सांगली – गेल्या काही वर्षांपासून देशातील काही राज्यांमध्ये क्रूरकर्मा टीपू सुलतान याची जयंती साजरी करण्याचा घाट घातला जात आहे. टीपू सुलतान हा बलात्कारी, धर्मांध, तसेच हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणारा होता. त्यामुळे असा टीपू सुलतान समाजाचा कधीच आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे अशा क्रूरकर्मा टीपू सुलतानची जयंती साजरी करणे तात्काळ बंद झाले पाहिजे, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबूले यांना देण्यात आले. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी, धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, अविनाश सावंत, अंकुश जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते. हेच निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनाही देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, टीपू सुलतानची जयंती साजरी करणे चालू झाल्यास औरंगजेब, आदिलशहा, निजामशहा यांच्याही जयंत्या साजर्या करण्याचा चुकीचा प्रघात चालू होऊ शकतो. अशा अनिष्ट प्रथांमुळे समाजात तेढ निर्माण हेऊन शांतता आणि सुव्यवस्था यांना बाधा येण्याची शक्यता आहे. तरी देशात आणि राज्यात टीपू सुलतानची जयंती साजरी करणे बंद होण्यासाठी कठोरातील कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच ती साजरी करणार्यांवर कठोर कारवाई करावी.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांच्या स्वतःहून हे लक्षात का येत नाही ? |