इयत्ता १० आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ !
मुंबई – अंतिम वार्षिक परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ नोव्हेंबर, तर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी १० वीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत, तर इयत्ता १२ वीसाठी ४ नोव्हेंबरपर्यंत वेळ होता; मात्र ही परीक्षा महत्त्वाची असल्याने मंडळाकडून ही मुदतवाढ दिली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज भरता येणार आहे. इयत्ता १० वीची परीक्षा २ ते २५ मार्च २०२३, तर इयत्ता १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे.