धर्मांतरासाठी साहाय्य करणार्या हिंदु शिक्षकाला नोकरीतून बडतर्फ करा !
पेण येथील सकल हिंदु समाजाची मागणी !
पेण, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील गंगेची वाडीवर आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात सार्वजनिक विद्यामंदिर, पेण येथील शिक्षक तुकेश मेंगाल हा प्राथमिक वर्गाचा शिक्षकही सहभागी होता. तो शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांचेही धर्मांतर करण्याची शक्यता असल्याने त्याला बडतर्फ करावे, यासाठी शाळेतील प्रशासन आणि अध्यक्ष यांना सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी सकल हिंदु समाजाचे श्री. मोहन पारटे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. प्रभुदास घरत, भाजपचे श्री. विशाल शिंदे आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर पोटे, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे धर्मप्रेमी उपस्थित होते. हिंदुत्वनिष्ठांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनाही संपूर्ण विषय समजावून सांगितला.