देेहलीत वायूप्रदूषणाचा हाहा:कार !
-
शाळा ऑनलाईन घेण्याचा आदेश
-
डिझेलवर चालणार्या वाहनांवर बंदी
-
श्वसनाच्या विकारांवरील रुग्णांत वाढ
नवी देहली – राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. सद्य:स्थितीत राजधानी क्षेत्रातील नोएडामध्ये ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ५६२ (गंभीर श्रेणी), तर गुरुग्राममध्ये ५३९ (गंभीर श्रेणी) आहे. दिल्ली विद्यापीठ परिसरात हा आकडा ५६३ च्याही वर आहे. देहलीचा एकूण ‘एअर क्वालिटी इंडेक्स’सुद्धा सध्या ४७२ च्या वर, म्हणजे गंभीर श्रेणीतच आहे.
१. गौतमबुद्ध नगर जिल्हा शाळा निरीक्षक धर्मवीर सिंह यांच्याद्वारे प्रसारित केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ८ नोव्हेंबरपर्यंत ही व्यवस्था अनिवार्य स्वरूपात लागू असणार आहे.
New Delhi: Several schools in Delhi-NCR and parents of students welcomed the government’s announcement on holding online classes for primary grades in view of rising pollution, and expressed hope that concerted efforts would be made by the authorities as well as people to address pic.twitter.com/u5DFf8tauo
— Deccan News (@Deccan_Cable) November 4, 2022
२. शाळांना सूचित करण्यात आले आहे की, जर शक्य असेल, तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्गही ऑनलाइन घेतले जावेत. याखेरीज वर्गाबाहेरील प्रार्थना, मैदानी खेळ आदींसारख्या कार्यक्रमांवर पूर्णपणे निर्बंध आणण्यात आले आहेत.
३. ‘श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती आराखडा’ अंतर्गत डिझेलवर चालणार्या वाहनांवर बंदी घालण्यात आली असून ट्रकना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
४. दुसरीकडे खराब हवेमुळे दवाखान्यांमध्ये श्वसनाच्या विकारांवरील रुग्णांची गर्दी वाढतांना दिसत आहे.