ऋषि सुनक हिंदु असले, तरी त्यांचे हृदय आणि मेंदू ब्रिटीश आहे !
ब्रिटनचे भारतातील राजदूत अॅलेक्स अॅएलिस यांचे प्रतिपादन
मुंबई – ऋषि सुनक हे हिंदु आहेत; मात्र त्यांचे हृदय आणि मेंदू पूर्णपणे ब्रिटीश आहे. ते भारतासाठी नाही, तर ब्रिटनसाठी काम करणार आहेत. ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन ब्रिटनचे भारतातील राजदूत अॅलेक्स अॅएलिस यांनी येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’ मध्ये केले. ‘भारत आणि ब्रिटन दोघे वेगवेगळे आहेत. त्यांच्यात फारच भेद आहे; मात्र दोघेही एकत्रितपणे त्यांच्या हितांसाठी काम करत रहातील, असेही ते म्हणाले.
British High Commissioner to India @AlexWEllis speaks in Hindi, says Rishi Sunak “दिल और दिमाग से पूरी तरह से ब्रिटिश है”. #ConclaveMumbai22 | @RajChengappa
Full coverage: https://t.co/TdmMk9nJH4 pic.twitter.com/E0TwOjAAek
— IndiaToday (@IndiaToday) November 4, 2022
संपादकीय भूमिका
|