बंगालमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या वाहनताफ्यावर गावठी बाँब आणि दगड यांद्वारे आक्रमण
तृणमूल काँग्रेसने आक्रमण केल्याचा भाजपचा आरोप
कूचबिहार (बंगाल) – केंद्रीय गृहराज्यमंत्री निसिथ प्रमाणिक यांच्या वाहनताफ्यावर येथे जमावातील काही लोकांकडून गावठी बाँब आणि दगड यांद्वारे आक्रमण करण्यात आले. प्रमाणिक सीताई येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण करणार्यांवर दगडफेक चालू केली. भाजपने प्रमाणिक यांच्यावरील आक्रमणाला राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला दोषी ठरवले आहे.
१. पोलीस अधीक्षक सुमित कुमार यांनी सांगितले की, मंत्र्यांचा ताफा येथून जात असतांना काही जणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्यावर धक्काबुक्की झाली. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
२. याविषयी राज्यमंत्री प्रमाणिक म्हणाले की, पोलिसांच्या उपस्थितीत जमाव लाठीकाठी, दगड आणि अन्य शस्त्रे घेऊन आला होता. जर पुन्हा आक्रमण झाले, तर भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत.
बंगालमध्ये यापूर्वी भाजपच्या नेत्यांवर झालेली आक्रमणे१. एप्रिल २०२१ मध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या वाहनताफ्यावर आक्रमण करत वाहनांची तोडफोड करून वाहनाच्या आतील साहित्य लुटण्यात आले होते. २. डिसेंबर २०२० मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या वाहनताफ्यावर आक्रमण करण्यात आले होते. त्यांचे वाहन बुलेटप्रूफ असल्याने ते बचावले होते. त्यापूर्वी भाजपचे बंगालचे समन्वयक कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती. यात वाहनाच्या काचा फुटल्या होत्या. ३. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि आमदार सुवेंदु अधिकारी यांच्या वाहनताफ्यावरही आक्रमणे करण्यात आली होती. |
संपादकीय भूमिका
|