टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया न दिल्याने पू. संभाजी भिडेगुरुजी यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस !
मुंबई – टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला; म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे.
‘महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही; म्हणून तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होतो. त्यांचेे वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोचवणारे आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने त्याची नोंद घेतली आहे’, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी २ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर निघतांना एका महिला पत्रकाराने त्यांना भेटीविषयी विचारणा केली. त्या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी या महिला पत्रकाराला ‘टिकली लावून ये. मगच प्रतिक्रिया देईन’, असे म्हटले. यावरून महिला आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. पत्रकार क्षेत्रातील, तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील पुरोगामी मंडळींकडून या प्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
सौजन्य : Zee 24 Taas
संपादकीय भूमिका
|