दिवाळीत पुणे येथे ८ दिवसांत १२ घरफोड्यांच्या घटना, अद्याप एकाही चोरास अटक नाही !
पुणे – येथे दिवाळीतील २३ ते २९ ऑक्टोबर या काळात १२ घरफोड्यांच्या गुन्ह्यांत जवळपास ५१ लाख ७५ सहस्र रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यामध्ये बंद घरांसह किराणा दुकाने आणि ‘मोबाईल शॉप’ही फोडल्याचे निदर्शनास आले आहे. अलंकार पोलीस ठाणे हद्दीतील बंगला, कर्वेनगर, शिवनेरी नगर-कोंढवा खुर्द, आनंदनगर-सिंहगड रस्ता आदी भागांत ५ ठिकाणी घरफोड्यांचे गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्यात अद्याप एकाही चोरास अटक करण्यात आली नाही.
संपादकीय भूमिकाएकाही चोरास अटक न होणे, हे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पहावे, असेच जनतेला वाटते ! |