पाकव्याप्त काश्मीर परत घ्या !
कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे सभेला उपस्थित नागारिकांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी
कांगडा (हिमाचल प्रदेश) – येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भाषण करत असतांना उपस्थित लोकांनी ‘पाकव्याप्त काश्मीर परत घ्या’ अशा घोषणा दिल्य. यावर उत्तर देतांना राजनाथ सिंह यांनी ‘धीर धरा’ असे सांगितले. काही दिवसांपूर्वीच राजनाथ सिंह यांनी काश्मीरमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना ‘पाकव्याप्त काश्मीरमधील बाल्टिस्तान आणि गिलगिटपर्यंत विकास करण्यात येईल’, असे विधान केले होते. त्यानंतर ‘चिनार कोर्प्स’चे कमांडर लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला यांनीही राजनाथ सिंह यांच्या विधानाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘आदेश मिळाल्यावर आम्ही मागे वळून पहाणार नाही’, असे विधान केले होते.
हिमाचल प्रदेश के जयसिंहपुर में रक्षा मंत्री राजनाथ सिंह एक जनसभा को संबोधित कर रहे थे. उनकी जनसभा के दौरान की कुछ लोगों ने ‘पीओके चाहिए’ के नारे लगाए-#RajnathSingh #BJP #HimachalPradesh https://t.co/33CeMBDUbD
— ABP News (@ABPNews) November 3, 2022
संपादकीय भूमिकाभारतीय नागरिक आता थेट संरक्षणमंत्र्यांकडे उघडपणे ही मागणी करू लागणे, हे ते जागृत झाल्याचेच लक्षण आहे ! ही भारतियांसाठी उत्साहाची घटना आहे. आता त्यांनी सरकारवर दबाव आणून सरकारला पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यास भाग पाडले पाहिजे ! |