चंद्रावर थेट सौर ऊर्जेद्वारे प्राणवायू, वीज आणि इंधन निर्मिती शक्य ! – नासाचा दावा
नवी देहली – पृथ्वीवरील ऊर्जेचा वापर करून १०० टक्के वीज उत्पादन करणे शक्य नाही; मात्र चंद्रावर ऊर्जेचा साठा न करताही १०० टक्के वीजनिर्मिती करता येऊ शकते, असा दावा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने केला आहे. सौर ऊर्जा ही त्यासाठीचे मुख्य स्रोत आहे. चंद्रावर मानवाची वस्ती करण्यासाठी योजना बनवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिले जात आहे.
सौर ऊर्जेद्वारे मोठ्या प्रमाणात प्राणवायूची (ऑक्सिजनची) निर्मितीही शक्य होणार आहे. त्याचा वापर मनुष्याला श्वास घेण्यासाठी होणार आहे, तसेच इंधनासाठी अन् विजेसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.