हरियाणातील मुसलमानबहुल नूंह जिल्ह्याच्या पंचायत निवडणुकीत हिंसाचार !

हिंदूंच्या घरांवरही आक्रमणे !

नूंह (हरियाणा) – मुसलमानबहुल नूंह जिल्ह्यात झालेल्या पंचायत निवडणुकीच्या वेळी गोकलपूर, चंडाका, जाटका सिसौना, बुबल्हेडी, बिसरू आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. चांदडाका गावात बूथ क्रमांक ६५ वर गोळीबारही करण्यात आला, तसेच दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे मतदान थांबवून मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले. गोळीबारात घायाळ झालेल्यांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. येथील एका ठिकाणी मतदानाच्या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका मशिदीजवळ मोठ्या संख्येने मुसलमान हिंसाचार करतांना दिसत आहेत.

१. नूंहमधील महंमद बॉस या गावात मुसलमानांच्या दोन गटांमध्येच हिंसाचार झाला. माजी सरपंच हनीफ यांनी सांगितले की, ते बूथ क्रमांक ११३ आणि ११४ मध्ये तेथील माहिती घेण्यासाठी गेले असता गफ्फार नावाची व्यक्ती तिच्या साथीदारांसह तेथे आली आणि हिंसाचार केला. या वेळी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीच्या डोक्याला गोळी लागली.

२. नगीना भागात हिंदूंच्या घरावरही आक्रमण करण्यात आले. हिंदूंनी सांगितले की, आमच्या घरांवर काचेच्या बाटल्या फेकण्यात आला, तसेच गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. जर मतमोजणीपर्यंत अशीच स्थिती राहिली, तर आम्हाला फार धोका आहे.

संपादकीय भूमिका

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंसाचार होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! सरकारचा गुन्हेगारांवर धाक असला पाहिजे !