गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला विधानसभेसाठी निवडणूक
८ डिसेंबरला निकाल !
नवी देहली – गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे. ही निवडणूक २ टप्प्यांत होणार आहे. एकूण १८२ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत १ डिसेंबरला ८९ जागांसाठी आणि ५ डिसेंबरला ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसमवेत या निवडणुकीचीही मतमोजणी ८ डिसेंबरला करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Election Commission announced the schedule for assembly election in #Gujarat#GujaratElections2022 https://t.co/GzuNbDZiTR
— IndiaToday (@IndiaToday) November 3, 2022
ते पुढे म्हणाले की, जर कुठल्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी (‘ईव्हीएम्’विषयी) प्रश्न उपस्थित केले आणि तो निवडणूक जिंकला, तर प्रश्न बंद होतात. निष्पक्ष निवडणुका हे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा निःपक्षपातीपणा सर्वश्रुत आहे. पूर्वीपासून निर्माण झालेली निष्पक्षता पुढे नेणे, हे आमचे कर्तव्य आहे.