दादर (मुंबई) येथील छबीलदास शाळेत ४ सिलेंडरचा स्फोट !
मुंबई – दादर (पश्चिम) येथील छबीलदास शाळेत २ नोव्हेंबर या दिवशी पहाटे ५ वाजताच्या कालावधीत एकापाठोपाठ ४ सिलेंडरचे स्फोट झाले. स्फोटामुळे आग लागून ३ जण घायाळ झाले आहेत. अग्नीशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी आल्यावर अर्ध्या घंट्यामध्ये आग विझवण्यात यश आले. घायाळ व्यक्तींना उपचारासाठी शीव रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. स्फोटामुळे शाळेच्या भिंतींना तडे जाऊन परिसरात काचेचे तुकडे पसरले आहेत. हा स्फोट कशामुळे झाला, त्याचे अन्वेषण पोलीस आणि अग्नीशमन विभाग यांच्याकडून चालू आहे.