‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना पू. भिडे गुरुजी म्हणाले, ‘‘मी राष्ट्रहिताच्या काही सूत्रांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली; मात्र मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे.’’
मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीही पू. भिडेगुरुजी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी बोलतांना त्यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. ते मुख्यमंत्री झाल्यापासून मला त्यांना भेटायचे होते; मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे आज वेळ काढून मी त्यांना भेटायला आलो. तसेच सरकारच्या कामागिरीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘सरकार उत्तमरित्या काम करत असून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ कौतुकास्पद आहे.’’