हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा पार पडला. या दौर्यामध्ये त्यांनी तेथील संत, आध्यात्मिक संस्थांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, प्रतिष्ठित आणि उद्योजक यांच्या भेटी घेतल्या, तसेच विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. याविषयीचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.
नेपाळचे खासदार आणि उद्योजक डॉ. बिमल केडिया यांच्याशी भेट
नेपाळचे उद्योजक आणि खासदार डॉ. बिमल केडिया यांनी ‘ॐकार एकता महाअभियाना’च्या कार्यक्रमामध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन ऐकले. त्यानंतर त्यांनी त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.
या भेटीत त्यांनी नेपाळमध्ये हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी चर्चा केली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी हिंदूंमध्ये जागृती करणे आणि त्यांना धर्मशिक्षित करणे यांविषयीचे महत्त्व विशद केले.
श्री. केडिया यांनी हिंदु जनजागृती समिती भारतात करत असलेले कार्य समजून घेतले आणि नेपाळ दौर्याच्या वेळी कोणतेही साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली.
‘विश्व हिंदु महासंघ, बुटवल’चे ज्येष्ठ उपाध्यक्ष अधिवक्ता बेनबहाद्दूर पौडेल आणि लोकनाथ पांड्ये यांची घेतली भेट !
‘विश्व हिंदु महासंघ, बुटवल’चे ज्येष्ठ उपाध्यक्ष अधिवक्ता बेनबहाद्दूर पौडेल आणि श्री. लोकनाथ पांड्ये यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची भेट घेतली. या वेळी अधिवक्ता पौडेल यांनी ‘बहुसंख्य नेपाळी जनतेला हिंदु राष्ट्र हवे आहे आणि त्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत; पण नेपाळमध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे’, असे सांगितले. यावर सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘सर्वप्रथम आपण आचरणाने हिंदु धर्माचे आचरण करायला हवे. लोकांच्या मनात धर्माचे विचार रुजवणे, त्यांना धर्मशिक्षित करणे, त्यांचा धर्माभिमान आणि त्यांचे आत्मबळ जागृत करणे आवश्यक आहे.’’
‘धर्म आणि साधना’ या विषयावर ‘स्वधर्म टीव्ही’ वाहिनीवर मुलाखत
मोक्षार्थीला प्रयत्नपूर्वक साधना करावी लागते ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
‘स्वधर्म टीव्ही’चे संचालक श्री. सुवास आगम यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची ‘धर्म आणि साधना’ या विषयावर मुलाखत घेतली. या वेळी ते म्हणाले, ‘‘साधना ही बाह्ययात्रा नाही, तर अंतरयात्रा आहे. व्यक्तीने साधना करून चित्तशुद्धी केली नाही, तर ती रावणच बनणार. मोक्षार्थीला प्रयत्नपूर्वक साधना करावी लागते. मोक्षासाठी पूर्ण गुरुकृपाच आवश्यक आहे.’’
सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याकडे अफाट ज्ञान असून त्यांची कित्येक दिवस मुलाखत घेऊ शकतो ! – सुवास आगम, संचालक, स्वधर्म टीव्हीसद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेतांना श्री. सुवास आगम (उजवीकडे)सद्गुरु डॉ. पिंगळे यांची मुलाखत झाल्यानंतर स्वधर्म टीव्हीचे संचालक श्री. सुवास म्हणाले, ‘‘मी आजवर अनेक संतांशी संवाद साधला; पण ते काय सांगतात, ते समजणे कठीण जात होते. याउलट सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे बोलणे ऐकल्यावर सर्व शंका दूर झाल्या. ते मोजक्या शब्दांत, नेमकेपणाने आणि इतरांना समजेल, असे सांगतात. त्यांच्याकडे एवढे अफाट ज्ञान आहे की, मी कित्येक दिवस त्यांची मुलाखत घेऊ शकतो.’’ मुलाखतीच्या वेळी भाव जागृत होऊन सुवास आगम यांनी उत्स्फूर्तपणे भक्तीगीत गाणेश्री. सुवास म्हणाले, ‘‘सद्गुरु डॉ. पिंगळे बोलत असतांना मला आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवत होत्या, तसेच सुगंध येत होता.’’ संवाद साधल्यावर श्री. सुवास यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्यासाठी स्वयंप्रेरणेने भावपूर्ण भक्तीगीत गायले. या वेळी उपस्थित सर्वांचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांमध्ये भावाश्रू आले. |
‘नेपाल ज्योतिष परिषद’चे सदस्य ज्योतिषाचार्य श्री. जनार्दन न्यौपाने यांच्याशी भेट
सांप्रदायिकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी एकत्र न येणे, हा या कार्यातील मोठा अडथळा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘नेपाल ज्योतिष परिषद’चे सदस्य ज्योतिषाचार्य श्री. जनार्दन न्यौपाने यांची भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी जर आपण एकत्र आलो नाही, तर त्यांच्या रक्षणाच्या कार्यात आपणच मोठे अडथळा आहोत, असे समजावे.’’
राजकीय नेते श्री. प्रशांत गुप्ता यांची घेतली सदिच्छा भेट !
नेपाळमधील राजकीय नेते श्री. प्रशांत गुप्ता यांची सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘आज हिंदुबहुल बुटवल शहराचा महापौर मुसलमान आहे. येथील तराई क्षेत्रामध्ये हिंदु सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक होऊ लागली आहे.’’ त्यावर सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘जागृत हिंदू हेच हिंदूंची शक्ती आहेत. त्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, तसेच येणार्या आपत्काळात साधनेचे बळ आवश्यक आहे.’’
‘हिंदु परिषद नेपाळ’चे अध्यक्ष श्री. संतोष पटेल यांची घेतली भेट !
सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘हिंदु परिषद नेपाळ’चे अध्यक्ष श्री. संतोष पटेल यांची भेट घेतली. या वेळी श्री. संतोष यांनी अनेक हिंदु संप्रदाय विविध देवतांची पूजा करणे आणि शिव मंदिरात जाणे यांविषयी हिंदूंची दिशाभूल केली जात असल्याविषयी चिंता व्यक्त केली. तसेच ‘राजकारणी हिंदु राष्ट्राविषयी जे बोलतात, प्रत्यक्षात त्याच्या उलट कृती करतात’, असेही त्यांनी सांगितले.
यावर सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले. शेवटी श्री. पटेल यांनी नेपाळमध्ये शुद्ध, प्रभावी आणि सक्षम नेतृत्त्व यांचा अभाव असल्याचे सांगत ‘तुम्ही त्यांना प्रशिक्षित करा’, अशी विनंती सद्गुरु डॉ. पिंगळे यांना केली.