धर्मांधांच्या असत्य प्रचाराला त्याच भाषेत अभ्यासपूर्ण उत्तर दिल्यास ते खोटे बोलण्याचे धाडस करणार नाहीत ! – नीरज अत्री, कार्याध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती
राममंदिराचे बांधकाम चालू असतांना बाबरचे उदात्तीकरण करणारी ‘दी एम्पायर’ नावाची वेब सिरीज येते. यात योगायोग नसून ठरवून हे श्रीराम मंदिर आणि हिंदुत्व यांच्याविरोधात केलेले षड्यंत्र आहे. पूर्वी ते लोक तलवारीच्या बळावर बाटवाबाटवी करायचे. आता मनावर सर्वाधिक प्रभाव टाकणार्या ‘वेब सिरीज’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शस्त्र म्हणून उपयोग करत आहेत. आपणही अशा असत्य प्रचाराला त्याच भाषेत अभ्यासपूर्ण उत्तर दिले पाहिजे. असे झाले तरच ‘कबीर खान’सारखे धर्मांध दिग्दर्शक ‘मोगल राष्ट्र निर्माते होते’, असे उघडपणे खोटे बोलण्याचे धाडस करणार नाहीत.