लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील शाळेत इंग्रजी वर्णमालेद्वारे भारतीय संस्कृती शिकवण्याचा प्रयत्न
विद्यार्थी शिकत आहेत ‘ए’ फॉर अर्जुन, ‘बी’ फॉर बलराम !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील १२५ वर्षे जुन्या अमीनाबाद इंटर कॉलेजच्या लहान मुलांना इंग्रजी वर्णमाला शिकवण्यासाठी प्रचलित उदाहरणे देण्याऐजवी हिंदूंच्या पौराणिक संदर्भांचा, तसेच नावांचा उल्लेख करण्यात येत आहे. उदा. ‘ए फॉर अर्जुन. इज अ ग्रेट वॉरियर’, बी फॉर बलराम. इज ब्रदर ऑफ कृष्णा’, असे शिकवण्यात येत आहे.
लखनऊ के स्कूल में अब ‘A’ से अर्जुन और B फॉर बलराम पढ़ाया जाएगा, ऐतिहासिक ज्ञान की तरफ अनोखी पहल #uttarpradesh #school #lucknow #cbse #upboard #study https://t.co/XM6Y7CGe2g
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) November 1, 2022
शाळेचे मुख्याध्यापक साहेब लाल मिश्रा यांनी सांगितले की, सध्याच्या मुलांना भारतीय संस्कृतीविषयी अल्प ज्ञान आहे. त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीविषयी माहिती मिळेल. इंग्रजी वर्णमालेप्रमाणेच हिंदी वर्णमालेचे पुस्तकही सिद्ध केले जात आहे. हिंदीमध्ये अनेक शब्द असल्याने पुस्तक बनवण्यास अधिक वेळ लागत आहे.
संपादकीय भूमिकाएखाद्या शाळेने असा प्रयत्न करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारांनीच अशा प्रकारचे पुस्तक बनवणे आवश्यक आहे ! गेल्या ७५ वर्षांत असा प्रयत्न न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच ! |