सावदा (जिल्हा जळगाव) येथील दोन लाचखोर पोलीस अधिकार्यांना अटक !
जळगाव – अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणारे सावदा (जिल्हा जळगाव) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ नोव्हेंबरला सकाळी अटक केली. शहरातील एका नोंद असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाच्या उपरोक्त अधिकार्यांनी ६० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ सहस्र रुपये देण्याचे ठरले. या संदर्भात संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. या अनुषंगाने पथकाच्या चौकशीत अधिकार्यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने देवीदास इंगोले आणि समाधान गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. (अशा भ्रष्ट अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिकापोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! |