एका सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावप्रयोग सांगत असतांना साधकाला आलेल्या अनुभूती
‘एकदा एका सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना एक भावप्रयोग सांगितला. त्यांनी सांगितले, ‘‘श्रीमहाविष्णूने तुम्हा सर्वांच्या मस्तकावर हात ठेवला आहे.’’ तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. त्या वेळी मला दिसले, ‘गुरुदेवांनी श्रीमहाविष्णूचे रूप धारण केले आहे. ते माझ्या डोक्यावर हात फिरवत आहेत. ते माझ्याकडे प्रीतीमय दृष्टीने पहात आहेत.’
२. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वहात होत्या.
३. मला थंडावा जाणवला.
४. ‘माझ्या शरिरातील प्रत्येक पेशी ‘जय गुरुदेव । जय गुरुदेव ।’ असा जयघोष करत आहे’, असे मी अनुभवले.
५. भावप्रयोगाची समाप्ती होत असतांना मला ‘पाठीच्या मणक्यातून शक्ती कुंडलिनीच्या स्थानापासून वर जात आहे’, असे अनुभवायला आले. ‘सद्गुरु आणि संत यांच्या संकल्पामुळे माझी अन् सर्व साधकांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे’, असे मला जाणवले.
गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था, देहली (२४.६.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |