नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या नावाखाली उघडपणे चालणार्या अश्लील नृत्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष !
मुंबई, १ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात डान्सबारला बंदी असल्यामुळे हॉटेल्स आणि परमिट रूम येथे चालणार्या अश्लील नृत्यांवर पोलिसांकडून कारवाई होते; मात्र उघडपणे सार्वजनिक ठिकाणी चालू असलेल्या अश्लील नृत्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. लावणीच्या नावाखाली राज्यात नृत्यांगना गौतमी पाटील यांचे सार्वजनिक नृत्याचे कार्यक्रम होत असून त्यामध्ये त्या अश्लील हावभाव करून नाचत असल्याचे आढळून आले आहे. लोककला म्हणून पाहिल्या जाणार्या ‘लावणी’ या कलेला गौतमी पाटील यांच्याकडून अश्लीलतेचे स्वरूप येत असल्याने लावणी क्षेत्रातील लोककलाकार अप्रसन्न आहेत.
१. गौतमी पाटील यांचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. मागील मासात एका कार्यक्रमात गौतमी पाटील यांनी सार्वजनिक कार्यक्रमात अत्यंत अश्लील हावभाव केल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला होता. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी समज दिल्यानंतर गौतमी पाटील यांना याविषयी सार्वजनिकरित्या क्षमायाचनाही केली. या वेळी ‘भविष्यात असे प्रकार होणार नाहीत’, असे त्यांनी सांगितले होते.
२. त्यानंतर काही प्रमाणात त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील हावभाव अल्प केले आहेत; मात्र त्यांचे नृत्य लावणीप्रमाणे नसून डान्सबारमधील नृत्याप्रमाणेच होत असल्याचे या आठवड्यात प्रसारित झालेल्या त्यांच्या व्हिडिओंतून दिसून येत आहे.
३. त्यांच्या या कार्यक्रमांना युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित रहात असून यातून राज्यात लोककलेच्या नावाखाली अश्लीलता पसरत आहे.
संपादकीय भूमिकाअश्लीलता पसरवणार्यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ? |