बावधन येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पात नियमांचे उल्लंघन !
पर्यावरणप्रेमींचा आरोप !
पुणे – बावधन येथील रामनदीकाठी पुणे महापालिकेने कचरा वर्गीकरण करण्यासाठीच्या प्रकल्पाचे बांधकाम चालू केले होते; मात्र प्रकल्पामुळे नदीकाठी प्रदूषण होणार असल्याने पर्यावरण कार्यकर्त्यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी या प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. यावर तातडीने सुनावणी घेत ‘११ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेने कोणतेही बांधकाम करू नये’, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. महापालिकेला ११ नोव्हेंबर या दिवशी उच्च न्यायालयासमोर म्हणणे मांडायचे आहे. सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव रहित केला असतांनाही प्रशासकीय हट्टापायी हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.