पाचोरा (जिल्हा जळगाव) येथील श्रीराम मंदिरात विविध उपक्रमांचे आयोजन !
जळगाव, १ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील पाचोरा येथील श्रीराम मंदिरात परम तपस्वी श्री. विष्णुदास महात्यागी आणि श्री. नीलकंठ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत श्री सीताराम जप, श्रीराम महायज्ञ आणि श्रीराम कथा यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत सव्वा कोटी ‘सीताराम’ जपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी जास्तीतजास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.