उघड लव्ह जिहाद !
आतापर्यंत लपूनछपून चालणारा लव्ह जिहाद पोलीस प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे उघडउघड चालू आहे, हे तेलंगाणातील करीमनगर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावरून दिसून आले. हलाल जिहादच्या कट्टर पुरस्कर्त्या असणार्या ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने येथे मुसलमानेतर तरुणी आणि महिला यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. तथापि यास विश्व हिंदु परिषदेने प्रखर विरोध केल्यामुळे या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आली. ही अनुमती जरी नाकारली असली, तरी या निमित्ताने हिंदूंना असलेला धोका अधोरेखित झाला. आज सरकारी यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन काहीही करत नसल्यामुळे मूठभर धर्मांध मुसलमानांकडून बहुसंख्य हिंदूंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे धर्मांध मुसलमान हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवत आहेत. लव्ह जिहादच्या या राक्षसाने बघता बघता त्याचे हात-पाय देशाच्या कानाकोपर्यांत पसरवले आहेत. या विरोधात कुठलेही सरकार ठोस पाऊल उचलतांना दिसत नाही; म्हणनूच आतापर्यंत छुप्या पद्धतीने चाललेला लव्ह जिहाद आता उघडउघड केला जाऊ लागला आहे.
हिंदूंसाठी ही अधिक चिंतेची गोष्ट आहे; कारण मुळात हिंदु मुलींनाच काय; पण हिंदूंनाच धर्मशिक्षण नसते. त्यामुळे त्यांच्यात धर्माविषयी अभिमान नसतो आणि हिंदु मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात सहजपणे अडकून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतात. लव्ह जिहादच्या विरोधात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आवाज उठवतात; परंतु सरकार त्याकडेही लक्ष देत नाही. यासाठी हिंदूंनीच आता मरगळ झटकून कंबर कसली पाहिजे. असे कार्यक्रम ही हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराची केंद्रे बनतील आणि पुढे सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत राहील. त्यामुळे अशा कार्यक्रमांविरुद्ध आणि एकूणच लव्ह जिहादसह धर्मावरील सर्व आघातांविरुद्ध वैध मार्गांनी लढा देणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच आहे.
लव्ह जिहादसह धर्मावरील सर्व आघातांविरुद्ध वैध मार्गांनी लढा देणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच ! |