गोशाळेच्या माध्यमातून २०० गोवंशियांचा सांभाळ !

दैनिक ‘सनातन प्रभात’ची कार्तिक वारी विशेष वृत्त मालिका

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चालवणार्‍या जाणार्‍या गोशाळेच्या माध्यमातून २०० लहान आणि मोठ्या अशा गोवंशियांचा सांभाळ केला जात आहे. गायींपासून मिळणारे दूध हे प्रतिदिन नैमित्तिक पूजेसाठी वापरण्यात येते, तर उर्वरित दूध हे रुग्णाईत, तसेच लहान बालकांचे पालक यांना विक्री केली जाते. गायींपासून मिळणारे गोमूत्र शेतकर्‍यांना १५ रुपये प्रतिलिटर दराने देण्यात येते. ‘लंपी’ रोगापासून (गायींना होणारा त्वचारोग) बचाव करण्यासाठी १०० टक्के गायींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून गायींपासून मिळणार्‍या शेणाचा श्रीक्षेत्र गोपाळपूर ते श्रीक्षेत्रमंगळवेढा या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना शेणखत म्हणून वापर करण्यात येत आहे.

देवस्थान समितीच्या माध्यमातून अल्प भूधारक शेतकर्‍यांना १ वर्ष कालावधीसाठी गायीचे खोंड विनामूल्य देण्यात येते. गायींसाठी मुक्त गोठ्याची व्यवस्था असून गायींना नियमितपणे पशूखाद्य, हिरवा चारा, कडबा असे देण्यात येते.