नेपाळमध्ये हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण !
|
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – नेपाळमधील महोत्तरी जिल्ह्यात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले. यात २० हून अधिक हिंदू आणि पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरी येथे तणावाचे वातावरण असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेनंतर महोत्तरी जिल्ह्यातील अनेक भागांत धार्मिक मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. (धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्याऐवजी हिंदूंच्या मिरवणुकांवर अशा प्रकारची बंदी घालणे, हे नेपाळची इस्लामी देशाकडे होत असलेली वाटचाल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! – संपादक)
Nepal: Hindu procession attacked by an Islamist mob in Mahottari, several people including police officials injured https://t.co/benRvhqBq8
— OpIndia.com (@OpIndia_com) October 31, 2022
१. नेपाळमधील हिंदु सम्राट सेना या हिंदूंच्या संघटनेने भंगहा नगरपालिका परिसरात देवीची विसर्जन मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक मुसलमानबहुल भागात गेल्यावर तेथे झेंडा लावण्यावरून मुसलमान पक्षाशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर मुसलमानांनी घरांच्या छतांवरून दगडफेक चालू केली. (कुठल्याही देशातील धर्मांध मुसलमानांची आक्रमणाची पद्धत एकसारखीच असते, हे लक्षात घ्या ! हे त्यांना कुठे शिकवले जाते, याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे ! – संपादक)
२. या आक्रमणात घायाळ झालेले हिंदु सम्राट सेनेचे अध्यक्ष राजेश यादव यांनी घटनेविषयी माहिती देतांना सांगितले की, पररिया या मुसलमानबहुल भागात मिरवणूक पोचताच तिच्यावर दगडफेक चालू झाली. दगडफेक करणार्यांमध्ये पुरुषांसमवेत महिलांचाही समावेश होता. यात २० हून अधिक हिंदूंच्या डोक्याला मार लागला. यापूर्वीही हिंदूंच्या मिरवणुकांवर अशा प्रकारची आक्रमणे झालेली आहेत. आम्ही त्यास विरोध करतो; मात्र एकूणच हिंदूंकडून आम्हाला सहकार्य केले जात नाही. (हा हिंदूंच्या संदर्भात सार्वत्रिक अनुभव आहे. असे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत ! – संपादक) दुसरीकडे नेपाळी प्रसारमाध्यमे नेपाळी नेत्यांच्या आदेशानुसार वागतात.
३. हिंदु सम्राट सेनेचे पदाधिकारी धीरज मंडल यांनी सांगितले, ‘आमचे नेते राजेश यादव यांची हत्या करण्याचे षड्यंत्र मुसलमानांनी रचले होते. जर आक्रमणाच्या दिवशी स्थानिकांनी आम्हाला साहाय्य केले नसते, तर यादव यांची हत्या झाली असती.’ याविषयी त्यांनी एक व्हिडिओ एका वृत्तसंकेतस्थलाला पाठवला आहे. त्यात इस्लामी वेशभूषा करणारे काही जण चर्चा करतांना राजेश यादव यांचे नाव घेतांना दिसत आहेत. यासह मंडल यांनी मिरवणुकीवरील आक्रमणाचाही व्हिडिओ पाठवला आहे. यात मुसलमान लाठीकाठी घेतलेले दिसत असून हिरवे ध्वज हातात धरून घोषणाबाजी करतांना दिसत आहेत.
४. धीरज मंडल यांच्या सांगण्यानुसार महोत्तरी जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या १५ टक्के झाली आहे. प्रशासन प्रत्येक प्रकरणात मुसलमानांचेच ऐकते. हिंदूंचे कुणीही ऐकत नाही.
५. हिंदु सम्राट सेनेच्या महिला पदाधिकारी मंजू मंडल म्हणाल्या की, आमच्यावर आक्रमण झाल्यानंतर आमच्याच लोकांविरुद्ध (हिंदूंविरुद्ध) गुन्हा नोंदवण्यात आला. राजेश यादव यांच्या अटकेचे वॉरंट काढण्यात आले. प्रशासन एकतर्फी कारवाई करत आहे.
संपादकीय भूमिका
|