इलॉन मस्क यांच्याकडून आता ट्विटरचे संचालक मंडळ विसर्जित !
नवी देहली – ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी आता ट्विटरचे संचालक मंडळ विसर्जित केले आहे. यापुढे या मंडळाचे दायित्व ते एकटेच संभाळणार आहेत.
Elon Musk dissolves Twitter’s board of directors https://t.co/7U0z4Cum9e
— BBC News (World) (@BBCWorld) October 31, 2022
यापूर्वी मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, तसेच अन्य अधिकारी विजया गड्डे आणि नेड सेगल यांना हटवले होते. आता ते एक चतुर्थांश, म्हणजे २ सहस्र कर्मचार्यांना कामावरून काढणार आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.