बाबा वेंगा यांनी वर्ष २०२३ विषयी सांगितलेली भाकिते खरी ठरल्यास जगात उलथापालथ !
|
नवी देहली – बाबा वेंगा या बल्गेरियातील दिवंगत महिलेने अनेक भाकिते सांगून ठेवलेली आहेत. यापूर्वी त्यांनी वर्तवलेली असंख्य भाकिते खरी ठरलेली आहेत. वर्ष २०२३ विषयी त्यांनी केलेली ५ भाकिते खरी ठरली, तर जगात उलथापालथ होऊ शकते. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते कुठेही लिहिलेली नाहीत. ती त्यांच्या अनुयायांकडून सांगितली जातात.
Baba Vanga’s ‘Spine-chilling’ Predictions For 2023#babavangapredictions #Predictions #biologicalweapons #Russia #UkraineRussiaWar️ #VladimirPutin #nuclearweapons #Solar #Alien #aliens #flood #droughthttps://t.co/eXbYnzGmtP
— India.com (@indiacom) October 31, 2022
१. पहिल्या भाकितानुसार एक मोठा देश जैविक शस्त्रांनी आक्रमण करण्याची शक्यता आहे. या भाकिताकडे रशिया-युक्रेन देशात चालू असलेल्या युद्धाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. रशियाकडून अशा प्रकारचे आक्रमण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२. दुसर्या भाकितामध्ये सौर वादळ किंवा सौर सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीवर वेगात पालट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
३. वर्ष २०२३ मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स (परग्रहावरील नागरिक) पृथ्वीवर आक्रमण करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
४. वर्ष २०२३ पर्यंत प्रयोगशाळेत मानव जन्माला येईल. येथे जन्माला येणार्या मानवाचे चारित्र्य आणि त्वचेचा रंग ठरवला जाईल.
५. अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे, असे ५ व्या भाकितामध्ये म्हटले आहे.
संपादकीय भूमिकासनातन गेली २ दशके ‘जगात आपत्काळ येईल’, असे सांगत आहे. त्याच दिशेने जगाची वाटचाल चालू आहे, हेच यातून लक्षात येते ! |