गंगेची वाडी (पेण) येथे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना हिंदुत्वनिष्ठांनी रोखले !
पेण, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील पेण येथील गंगेची वाडी या आदिवासी वाडीमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार आणि हिंदूंचे धर्मांतर यांसाठी ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी सभेचे आयोजन केले होते. कासू येथील हिंदुत्वनिष्ठांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन तो कार्यक्रम बंद पाडला. धर्मांतराच्या उद्देशाने आलेल्या शर्मिला रमेश गावित यांच्याजवळील साहित्यात बायबल असल्याचे उघड झाले. त्यांच्या समवेत त्यांचे पती आणि पेण सार्वजनिक विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
मनसे कार्यकर्ते श्री. नागेश गावंड यांनी धर्मप्रचारकांना विरोध केला. ज्या घरात हा कार्यक्रम आयोजित केला होता, तेथील महिलांनी ‘त्यांना सोडा, ते पुन्हा येणार नाहीत’, असे बोलून त्यांची पाठराखण केल्याचे समजले. (धर्मशिक्षणाअभावी हिंदूंनी अन्य धर्मीय जवळचे वाटतात. यातूनच गावागावातून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची अनिवार्यता दिसून येते ! – संपादक)
विशेष म्हणजे श्री. नागेश गावंड यांच्या आजीचे निधन झालेले असतांनाही त्यांनी तत्परतेने धर्मकार्यासाठी पुढाकार घेऊन धर्मांतर रोखण्यासाठी तेथे आले. (असे हिंदुत्वनिष्ठ हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|