‘वेदांता फॉक्सकॉन’ प्रकल्पाविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिशाभूल ! – आमदार आदित्य ठाकरे
मुंबई – १९ जानेवारी २०२२ या दिवशी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वेदांता फॉक्सकॉनला पत्र पाठवून महाराष्ट्रात आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यात येईल, असे सांगितले. १४ मे २०२२ या दिवशी त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारला अर्ज केला. ‘वेदांता फॉक्सकॉन’ प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या बाहेर गेला, ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे, असा आरोप माहिती ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला.
या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘राज्यातून बाहेर गेलेला ‘वेदांता फॉक्सकॉन’ आणि ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प वेगवेगळे आहेत. ‘फॉक्सकॉन’ हा वर्ष २०२० मध्ये राज्याबाहेर गेलेला प्रकल्प भ्रमणभाषविषयीचा आहे, तर ‘वेदांता फॉक्सकॉन’ हा प्रकल्प सेमीकंडक्टरचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत आहे, जे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले त्यांच्याविषयी उपमुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे. महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचे गाजर दाखवले जात आहे.’’