प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार रुग्णालयात भरती !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ते २ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालयात उपचार घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.