रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
१. ‘आश्रम पाहून मी हिंदू असल्याचा मला अभिमान वाटला.’ – श्री. प्रवीण क. डोंगरे, जायंटस ग्रुप, कर्ला, रत्नागिरी.
२. ‘आश्रमात आल्यानंतर माझ्यात आपोआपच सात्त्विक भाव निर्माण झाला, तसेच माझ्या अंगात आपोआपच एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. येथील साधकांची सेवाभावी वृत्ती पाहून मी प्रभावित झालो.’ – श्री. धनाजी रामचंद्र मोहिते (अध्यक्ष, कॉन्टॅ्रक्टर असोसिएशन), तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
३. ‘मला आश्रमातील सात्त्विकता आणि पवित्रता प्रकर्षाने जाणवली. आश्रमाचे संशोधनकार्य समाजासाठी पुष्कळच लाभदायी आहे.’ – श्री. सूरज इम्रतलाल रवे, भिंगार, नगर.
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.६.२०२२)