विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून चोरांना पकडणार्या पोलिसांचे अभिनंदन !
समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील मूर्तींची चोरी झाल्याचे प्रकरण
मुंबई – जांबसमर्थ येथील समर्थ रामदासस्वामींच्या देवघरातील राम पंचायतन मूर्तींची चोरी करणार्या चोरांना शोधून अटक केल्याविषयी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना जिल्ह्यातील पोलिसांचे पोलीस अधीक्षक, अक्षय शिंदे यांना पत्राद्वारे आणि भ्रमणभाषद्वारे अभिनंदन केले. ‘पुढेही अशी उत्कृष्ट कामगिरी करावी’, अशी सदिच्छाही त्यांनी या वेळी दिली.