राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
वाढदिवसाचे विज्ञापन आस्थापनाच्या फलकावर विनाअनुमती करण्याचे प्रकरण
पुणे – मिठानगर येथील ‘अशोक म्युज सोसायटी’च्या परिसरातील चौकात विज्ञापन आस्थापनाची अनुमती न घेता वाढदिवसाचे विज्ञापन, ‘कॅप्शन आऊटडोअर ॲडव्हरटायजिंग’ या आस्थापनाच्या फलकावर लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विज्ञापन आस्थापनाच्या फलकाचा वापर केल्याने विज्ञापनाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या आस्थापनातील अधिकार्याला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी विज्ञापन आस्थापनाचे अधिकारी अतुल संगमनेरकर यांनी तक्रार दिली आहे.