दिग्दर्शक साजिद खान यांनी लैंगिक छळ केल्याचा अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांचा आरोप !
मुंबई – दिग्दर्शक साजिद खान यांनी लैंगिक छळ केला असल्याची तक्रार अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी जुहू पोलीस ठाण्यात केली आहे. आरोपी (साजिद खान) ‘बिग बॉस’ (दूरचित्रवाहिनीवरील एक मालिका)च्या घरात बसून आराम करत आहे. ‘पोलिसांनी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी’, यासाठी अभिनेते सलमान खान यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे, असे शर्लिन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी साजिद खान यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. अलीकडेच राणी चॅटर्जी यांनीही साजिद यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे त्यांना वर्षभर चित्रपट क्षेत्रात काम न करण्याचे आदेश देण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाहे आहे चित्रपट व्यवसायाचे खरे स्वरूप ! पोलीस आणि कायदा यांचा कोणताही धाक (भय) न रहिल्यानेच धर्मांध वारंवार अशा प्रकारेचे गुन्हे करून उजळ माथ्याने फिरत आहेत ! |