श्रीमद्भगवद्गीतेसारखे अमूल्य ज्ञान देऊन शेकडो साधकांना स्वभावदोष आणि अहं रूपी कौरवांविरुद्ध अर्जुनाप्रमाणे लढण्यासाठी सिद्ध करणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजित माथूर !
‘सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे घेते. तेव्हा तिला आणि त्या आढाव्यात शिकण्यासाठी बसणार्या साधकांना पाहून मला वाटते, ‘ज्याप्रमाणे महाभारतात युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि त्याला कौरवांविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध केले, त्याचप्रमाणे सुप्रियाताई आढाव्यांच्या माध्यमातून साधकांना गीतेसारखे ज्ञान देत आहे. आढाव्यात बसणारे साधक अर्जुनाप्रमाणे असून ते त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून घेऊन स्वभावदोष आणि अहं रूपी कौरवांविरुद्ध लढायला सिद्ध होत आहेत.
श्रीकृष्णाने १८ दिवस गीता सांगितली; पण सुप्रियाताईने गेली अनेक वर्षे गीतेसारखे अमूल्य ज्ञान प्रतिदिन अनेक साधकांना देऊन आतापर्यंत शेकडो साधकांना स्वभावदोष आणि अहं रूपी कौरवांविरुद्ध अर्जुनाप्रमाणे लढण्यासाठी सिद्ध केले आहे आणि अजूनही करत आहे.’
अशी सुप्रियाताई आम्हा साधकांना दिल्याबद्दल श्रीकृष्णरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आणि तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही हे कठीण असे ज्ञानशक्तीचे कार्य अनेक वर्षे अव्याहतपणे करणार्या सौ. सुप्रियाताई हिच्याप्रती आम्ही सर्व कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– कु. मधुरा गोखले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२१)
|