देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना धमक्या
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांच्या भक्तांकडून धमक्या मिळत असल्याचा मालिवाल यांचा आरोप
नवी देहली – डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांच्या भक्तांकडून मला धमक्या मिळत आहेत, असा आरोप देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी केला. या आरोपांविषयी राम रहीम किंवा त्यांच्या डेरा सच्चा सौदा या संप्रदायाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणार्या राम रहिम यांना नुकतेच ४० दिवसांच्या ‘पॅरोल’वर सोडण्यात आले आहे. पॅरोल म्हणजे चांगल्या वर्तणुकीसाठी बंदीवानाला काही दिवसांसाठी अटींवर बाहेर सोडले जाते. राम रहीम यांच्या पॅरोल देण्यावरून स्वाती मालिवाल यांनी हरियाणा सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच पंतप्रधान मोदी यांनी पॅरोलच्या संदर्भातील नियमांमध्ये पालट करण्यास सुचवले आहे.
जब से राम रहीम के खिलाफ आवाज़ उठाई है उसके अनुयाई कह रहे हैं बाबा से बचकर रहियो.
मेरा जवाब सुन लो – मेरी रक्षा भगवान करेंगे, ऐसी धमकियों से मैं नहीं डरती, सच की आवाज़ उठाती रहूंगी, हिम्मत है तो सामने से आकर गोली मारो….! pic.twitter.com/Id8yikqyhQ
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) October 29, 2022
स्वाती मालिवाल यांनी धमकीविषयी ट्वीट करून म्हटले आहे की, माझी सुरक्षा देव करेल. अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. मी सत्यासाठी बोलत राहील. धाडस असेल, तर समोर येऊन गोळ्या घाला.