छटपूजा उत्सवात पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी !
पिंपरी (जिल्हा पुणे) – उत्तर भारतीय बांधवांकडून शहरातील सर्व घाटांवर छटपूजा उत्सव ३० ऑक्टोबर या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. येथील चिंचवडच्या पवना नदी किनारी, बिर्ला हॉस्पिटल रोड येथील खंडू चिंचवडे घाट (हॉटेल रिव्हर व्ह्यू, गणपती विसर्जन घाट) येथे छटपूजेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाने पोलीस सुरक्षा पुरवावी, अशी मागणी छटपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.