ठाणे महापालिका आयुक्तांकडून लाचखोर शिपायाचे निलंबन !
जन्म दाखल्यासाठी पैसे घेतल्याचे प्रकरण
ठाणे, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणार्या कावेसर येथील उपकार्यालयामध्ये मुलीच्या जन्माचा दाखला घेण्यासाठी गेलेल्या महिलेकडे पैशांची मागणी करून तिच्याकडून शिपायाने ५०० रुपये घेतले. महिलेने याविषयी सामाजिक माध्यमांवर संताप व्यक्त केला. महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्याची नोंद घेऊन शिपायाला निलंबित केले. उपकार्यालयीन अधीक्षक आणि लिपिक अशा दोघांनाही या प्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
संपादकीय भूमिकालाच घेतली जाते याविषयी आयुक्त अनभिज्ञ आहेत कि ते स्वत:हून अशांचा शोध घेत नाहीत ! |