पुणे शहरातील ७५ ठिकाणचे रस्ते दुरुस्त करावेत; पोलीस आयुक्तांची मागणी !
पुणे – शहरातील वाहतूककोंडी ही पोलिसांच्या दुर्लक्ष केल्यामुळे नव्हे, तर खराब रस्ते आणि त्यावरील खड्डे यांमुळे होते. त्यामुळे शहरातील ७५ ठिकाणचे खराब रस्ते नीट करावेत आणि खड्डे तातडीने भरून घ्यावेत, अशा मागणीचे पत्र पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिकेला दिले आहे. मागील १-२ मासांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याची समस्या निर्माण झाली होती. वाहतूककोंडीच्या ठिकाणी पोलीस उपलब्ध नसल्याने पोलीस यंत्रणेवर टीका होत होती. या परिस्थितीवर पोलीस आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणांची सूची सिद्ध करून महापालिका आयुक्तांना सादर केली आहे. या ठिकाणचे रस्ते आणि खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी केली आहे.