राज्यभरात हलालविरोधी कृती समिती स्थापन करून ‘हलाल सक्ती’ला विरोध करणार ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
संभाजीनगर येथे हिंदूसंघटन मेळावा पार पडला !
संभाजीनगर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – भारत ‘सेक्युलर’ देश असतांना देशात धर्माच्या नावावर समांतर अशी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ हलाल प्रमाणपत्राद्वारे निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला, तसेच राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशा हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’मध्ये उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना केले. संभाजीनगर येथील अष्टविनायक मंदिर, पन्नालाल नगरच्या सभागृहामध्ये नुकतेच या हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या गेल्या २० वर्षांतील कार्याचा परिचय श्री. निरंजन चोडणकर यांनी सांगितला. या मेळाव्याला हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी हिंदु मंदिरांच्या सरकारीकरणामुळे झालेले तोटे आणि त्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषद देत असलेला कायदेशीर लढा यांविषयी सविस्तर माहिती सांगितली. हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले, श्री. अतुल देवकर यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.
#hjs_20thanniversary
निमित्त आयोजित
छत्रपति संभाजीनगर येथील हिंदू संघटन मेळाव्यात 150 हुन अधिक हिंदूराष्ट्रवीरांनी राष्ट्र व धर्मावर होणाऱ्या आघातांना रोखण्यासाठी व हलाल जिहादला संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार करून हलाल सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना केली.@Ramesh_hjs @HJS_PJ pic.twitter.com/W8yXHbTLeO— Sunil Ghanwat (@SG_HJS) October 12, 2022
क्षणचित्रे
१. या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ हिंदूसंघटन मेळाव्यास १५० हून अधिक हिंदु धर्मप्रेमींनी सहभाग नोंदवला.
२. नाथभक्त पू. यशवंत महाराज शिवनगिरीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
३. मेळाव्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित हिंदु धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.