इन्सुली (तालुका सावंतवाडी) येथील सनातनचे साधक तथा निवृत्त गटविकास अधिकारी जयदेव नाणोसकर यांचे निधन
बांदा – सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील सनातनचे साधक तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे निवृत्त गटविकास अधिकारी जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे, मूळ गाव नाणोस, तालुका सावंतवाडी) यांचे २९ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता इन्सुली येथील रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ विवाहित मुलगे, १ विवाहित मुलगी आणि नातवंडे, असा परिवार आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे.
वर्ष १९८९ पासून जयदेव नाणोसकर यांनी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्यास प्रारंभ केला. कुडाळ सेवाकेंद्रात त्यांनी काही वर्षे पूर्णवेळ सेवा केली होती. त्यांची मुले संदीप आणि डॉ. संतोष अन् त्यांची कुटुंबे बांदा येथे सेवा करतात, तर संजय (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि त्यांचे कुटुंब सनातनच्या देवद येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत. सनातन परिवार नाणोसकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.