महंमद ओवैस याच्याकडून उपचारांच्या नावाखाली ८ वर्षे लोकांची दिशाभूल होत असतांना आता जागे झालेले पोलीस !
‘कन्नूर (केरळ) जिल्ह्यामध्ये उपचारांच्या नावावर लोकांची दिशाभूल करणार्या महंमद ओवैस याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ओवैस रुग्णांना कुराणामधील ‘आयते’ (कुराणातील वाक्ये) म्हणत पाणी देत होता. तो लोकांना भीती दाखवायचा की, डॉक्टर ‘सैतान’ आहेत आणि रुग्णालय ‘नरक’ आहे. तुमचा रुग्णालयात मृत्यू आला, तर तुम्हाला ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही उपचारांसाठी रुग्णालयामध्ये जाऊ नका. हा प्रकार गेल्या ८ वर्षांपासून चालू होता. रुग्णांना डॉक्टरांकडे जाण्यापासून परावृत्त केल्याने अनेकांचा मृत्यूही झाला.’