रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
१. आश्रमातील वातावरण आल्हाददायक आहे !
‘आश्रमातील वातावरण आल्हाददायक आहे. असे समाजात कुठेही पहायला मिळत नाही. येथे सर्वत्र आनंद आहे. येथील साधकांचे वागणे सात्त्विक आहे. नामसंकीर्तनाची एक वेगळीच शक्ती आहे, जिला कोणत्याही भाषेची मर्यादा नाही. त्या शक्तीचा उपयोग करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो.’
– श्री. पद्मनाभ होळ्ळा, बेंगळुरू
२. आश्रमात राष्ट्रीय एकात्मता जाणवली !
‘आश्रमात आल्यानंतर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात पुष्कळ शिकायला मिळाले. आश्रमात मला राष्ट्रीय एकात्मता जाणवली, जी बाहेर समाजात जाणवत नाही.’ – अधिवक्ता शिवानंद एम्. बण्णूर, गोकाक, बेळगाव, कर्नाटक.
३. ‘सनातन आश्रम हे आध्यात्मिक गुरूंचे घर आहे. येथील आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शन अवर्णनीय आहे.’ – श्री. आदित्यकुमार एच्.आर्., बेंगळुरू
‘सूक्ष्म जगताचे प्रदर्शन’ पाहून दिलेले अभिप्राय
१. ‘सूक्ष्म जगताच्या प्रदर्शनामध्ये संग्रहित केलेल्या समकालीन वस्तूंचे संशोधन करून त्याचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून विश्लेषण केले आहे.’ – श्री. आदित्यकुमार एच्.आर्., बेंगळुरू
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांमध्ये झालेले नैसर्गिक पालट पहायला मिळाले. साधकांवर होत असलेले वाईट शक्तींचे आक्रमण आणि त्यांवरील उपाय अनुभवता आले.’ – अधिवक्ता शिवानंद एम्. बण्णूर, गोकाक, बेळगाव, कर्नाटक.
३. ‘चांगली आणि वाईट शक्ती अन् त्यांच्यात होत असलेले सूक्ष्म युद्ध याविषयी समजले.’ – डॉ. आय. राजलक्ष्मी, भाग्यनगर
(सर्व सूत्रांचा दिनांक २६.१२.२०१९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |